पाहा व्होटिंग ट्रेंड्स काय म्हणतात?
मुंबई : मागील ७० दिवसांपासून कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर सुरु असणारा बिग बॉस मराठी सीजन ५ (Big Boss Marathi 5) या शो’चा आज ग्रँड फिनाले (Grand Finale) पार पडणार आहे. आज बिग बॉसच्या घरातील १४ आठवड्यांचा प्रवास संपणार असून विजेता मिळणार आहे. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सहा सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले असून यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
व्होटिंग ट्रेंड्स काय सांगतात?
व्होटिंग ट्रेंड्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा लाडका ‘गुलिगत किंग’ सूरज चव्हाण आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंकिता वालावरकर, तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत, धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर तर निक्की तांबोळी पाचव्या क्रमांकावर असणार आहे. तसेच जान्हवी किल्लेकर याबाबतीत पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन इतर सीजन पेक्षा प्रचंड गाजला. निक्की तांबोळीचं बाईईई… काय प्रकार, सूरज चव्हाणची झापुक-झुपुक स्टेप, अभिजीतचं गाणं यामुळे यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. परंतु आता काही तासांत हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.