Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीChembur Fire : मुंबईत अग्नितांडव! चेंबुरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

Chembur Fire : मुंबईत अग्नितांडव! चेंबुरमधील एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईमधून (Mumbai News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात भीषण आग (Chembur Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाच घरातील ७ जणांचा मृत्यू झाला असून इतर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एका घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घरातील सर्व सदस्य झोपेत असताना ही आग लागली. जाग येताच स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे गुप्ता परिवारातील ७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

शिवडीच्या भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही भीषण आग

शिवडीच्या (Sewri) भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही (Bharat Industrial Estate) आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इंडस्ट्रिअल एस्टेटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच १० फायर इंजिन आणि १० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -