मुंबई : प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर आपली चाल परिवर्तन करतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत नक्षत्र परिवर्तन (Shani Nakshatra Parivartan) करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल ३० वर्षांचा काळ लागतो. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींवर (Horoscope) होतो. त्यामुळे त्या राशीतील लोकांवर परिवर्तनाचा शुभ किंवा अशुभ परिणाम होतो.
ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनीने नक्षत्र परिवर्तन केले आहे. या परिवर्तनाचा परिणाम काही राशींवर पडणार असून त्या राशीतील लोकांच भविष्य पुढील दोन महिन्यांपर्यंत उजळून राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
वृषभ (Taurus Horoscope)
या राशीतील लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच केलेल्या मेहनतीचं चांगलंच फळ मिळेल. या काळात लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. त्याचबरोबर नोकरीत चांगलं यश मिळेल.
तूळ (Libra Horoscope)
या राशीतील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या नक्षत्राच्या परिवर्तन काळात चांगली नोकरी मिळेल. आयुष्यात सकारात्मकता वाढून मानसिक रुपात असणाऱ्या अडचणी दूर होतील. समाजात देखील या लोकांचा तुमचा मान-सन्मान वाढेल.
धनु (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला प्रमोशनची चांगली संधी मिळेल. तसेच, तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण चांगलं असेल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करीत नाही. )