Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNarendra Modi : बंजारा समाजाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या काँग्रेसपासून सावध व्हा; पंतप्रधान...

Narendra Modi : बंजारा समाजाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या काँग्रेसपासून सावध व्हा; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

वाशिम : ज्यांना कोणी विचारत नाही, त्यांना हा नरेंद्र मोदी आज पूजतो आहे. भारताच्या निर्मितीत बंजारा समाजाने इथल्या संस्कृतीत फार मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कला, संस्कृती, राष्ट्रभक्ती, व्यापार इत्यादी प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाच्या महापुरुषांनी, महान विभूतींनी देशासाठी काय- काय नाही केलं? समाजासाठी अनेकांनी आपले सर्वस्व त्यागले. आमच्या बंजारा समाजातील अशा कित्येक साधुसंत, महंतांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मासाठी नवी चेतना दिली. मात्र, ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या संपूर्ण समाजाला अपराधी घोषित केलं होतं. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची जबाबदारी होती की, बंजारा समाजाची चिंता केली पाहिजे, त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. मात्र तसं झाले नाही. त्यावेळच्या काँग्रेस (Congress) सरकारने नेमकं काय केलं? काँग्रेसच्या त्यावेळच्या सरकारने उलट या समाजाला मुख्य धारेपासून वेगळं केलं.

काँग्रेस पार्टीवर स्वातंत्र्यानंतर ज्या परिवाराने ताबा मिळवला, त्यांची विचारधारा ही आधीपासूनच विदेशीच राहिली आहे. त्यांना कायम वाटत राहील आहे की, भारतावर कायम एका कुटुंबाचीच मक्तेदारी राहिली पाहिजे. कारण त्यांना हा हक्क ब्रिटिशांनी दिला होता. म्हणून त्यांनी बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायमचं ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाशिमच्या (Washim) सभेतून काँग्रेसवर चांगलीच घणाघाती टीका केली आहे.

काँग्रेसपासून सावधान व्हा- पंतप्रधान मोदी

शेतकऱ्यांची काँग्रेसने त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लूट केली. देशाला पुढे जाण्यासाठी जे लोक अडवणूक करत आहेत, काँग्रेसला अशा लोकांचा सपोर्ट हा मिळतो आहे. काँग्रेसपासून आपण सावधान झाले पाहिजे. आपली एकता हीच या देशाला अबाधित ठेऊ शकणार आहे. दिल्लीमध्ये नुकतेच कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले. मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणजे या ड्र्क्स रॅकेट मधील खरा सूत्रधार कोण निघाला? तर तो काँग्रेसचा एक नेता निघाला आहे. काँग्रेस युवकांना नशेच्या आहारी लावून त्या पैशातून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस अर्बन नक्षल यांची टोळी चालवत आहे. अशांपासून आपण सावधान झाले पाहिजे. सोबतच दुसऱ्यांना देखील सावधान केलं पाहिजे. आपण सर्वांनी देशाविरुद्धची लढाई एकत्र येऊन लढली पाहिजे, यावेळी असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांना डबल फायदा

आज हरियाणामध्ये मतदान होतं आहे. त्या अनुषंगाने हरियाणामधील सर्व देशभक्तांना मी विनंती करतो की, लोकांनी जास्तीत जास्त मतदानाला जाऊन आपले बहुमूल्य मत दिले पाहिजे. हरियाणाच्या विकासाला आपले मत नव्या उंचीवर घेऊन जाईल. नवरात्रीच्या पवन पर्वावर मला पीएम किसान सन्मान योजनेचा १८ व हफ्ता देता आला. देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी निधी देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिनचे सरकार तर आपल्या शेतकऱ्यांना डबल फायदा मिळवून देत आहे. राज्यातील ९० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या निधीचा वाटप करण्यात आला. पोहरादेवीच्या कृपाशीर्वादाने मला लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही निधी देण्याचे सौभाग्य मिळाले. नारी शक्तीचा सन्मान ही योजना वाढवत आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -