Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीदंड ठोठावला तरीही दादा, भाऊ, काका, मामांना लगाम लावण्यात पोलिसांना अपयश!

दंड ठोठावला तरीही दादा, भाऊ, काका, मामांना लगाम लावण्यात पोलिसांना अपयश!

अमरावती : अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे २८०२ वाहनधारकांना ई-चालानने दंड ठोठावला. तरीही ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘बॉस’, ‘भाऊ’ अशा फॅन्सी नंबर प्लेटला लगाम बसलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक पोलीस फॅन्सी नंबर प्लेटबाबत मोहीम हाती घेणार आहेत.

शहरातील काही वाहनधारक, विशेषतः राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या मोटारसायकल, कारवर ‘दादा’, ‘मामा’ नंबरप्लेट वापरतात. शहरातील साखळी चोरीच्या घटनांमध्येही बरेचदा दुचाकीवरील नंबर चटकन ओळखू येऊ नये म्हणून कलाकुसर करून नंबर टाकण्यात येत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

त्यामुळे वाहतूक शाखेने यंदा २८०० च्या आसपास वाहनधारकांवर कारवाई करत ५०० पेक्षा अधिक वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकल्या. ‘नो- पार्किंग’मधून उचलून आणलेल्या गाड्यांमध्येदेखील अशी गाडी आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील अनेक दुचाकींच्या मागील नंबर प्लेटवर ‘बॉस’, ‘भाई’, ‘दादा’, ‘काका’, ‘मामा’ अशी अक्षरे दिसतात. ही काही नातेवाइकांची नावे नाहीत, तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फटफट आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

सध्या फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड आले आहे. नंबर प्लेटवर कोणत्याही प्रकारचे सांकेतिक चिन्ह किंवा तत्सम गोष्टी लावणे नियमांच्या विरोधात आहे. त्याला दंडही ठोठावला जातो. मात्र, त्यानंतरही ते फॅड कमी झालेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -