Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअन्यायाला वाचा फोडणारी 'दुर्गा'

अन्यायाला वाचा फोडणारी ‘दुर्गा’

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल 

दुर्गा ही नवी कलर्स वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामध्ये दुर्गाची शीर्षक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेली अभिनेत्री म्हणजे रूमाणी खरे होय.

संदीप खरे या ख्यातनाम लेखक, कवीची ही कन्या. एक पाऊल पुढे जाऊन तिने अभिनयाचा मार्ग स्वीकारला. रूमाणी मूळची पुण्याची. पुण्यातल्या अभिनव विद्यालयात तिचे इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण झाले; परंतु बालपणापासून वडिलांमुळे तिचा संबंध मराठी काव्य, लेखनाशी आला होता. शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. १२ वर्षे ती कथ्थक नृत्य शिकली. त्यासोबत हीपॉप, वेस्टर्न नृत्य करायलादेखील तिला आवडते. थोडक्यात म्हणजे तिला सर्व कला एक्सप्लोर करायला आवडतात. त्यानंतर तिने एस. पी. कॉलेजमध्ये कला शाखेत (इंग्रजी) माध्यममध्ये प्रवेश घेतला. ती जेव्हा इ. ९ वीत होती तेव्हा तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, फिरोदिया स्पर्धा पाहिली होती. त्याच वेळेपासून तिला अभिनयाच्या क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झाले. नंतर एस. पी. कॉलेजला गेल्यावर तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. फिरोदिया स्पर्धेसाठी बॅक स्टेज केले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला. थेस्पो या नॅशनल एकांकिका स्पर्धेत तिने भाग घेतला. नाटकाचे लेखन व नाटकदेखील बसवले होते.

शाळेत असताना ‘चिंटू’ नावाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. त्यात तिची निवड झाली. तो सुखद अनुभव तिला मिळाला. पुढे कॉलेजला आल्यावर तिला अभिनयाचे हे क्षेत्र आवडू लागले. आशीष भेंडेनी दिग्दर्शित केलेला व परेश मोकाशीने लिहिलेला ‘आत्मपामप्लेट’ चित्रपट केला. त्यानंतर ‘तु तेव्हा तशी’ ही मालिका केली.

‘दुर्गा’ ही कलर्स वाहिनीवरील मालिकेत ती दुर्गाची भूमिका आहे. प्रेम की प्रतिशोध या द्विधा मनःस्थितीत ती आहे. ती कणखर व विचार करणारी पत्रकार आहे. ती गरीब घराण्यात वाढलेली होती. तिचे वडील राजकीय नेते असतात. ते लोकांची कामे करीत असतात. दुर्देवाने तिच्या दहाव्या वाढदिवसाला तिचे वडील परलोकी जातात. त्यावेळी तिची आई प्रेग्नंट असते. ती व तिची आई ट्रॉमामध्ये जाते. तिला वाटत तिच्या वडिलांचे चुकले असावे, त्यामुळे ती वडिलांचा तिरस्कार करते. तिची आई गेल्या चौदा वर्षांपासून कोमामध्ये असते, त्यामुळे ती दुर्गाला ओळखत नाही. ती तिच्या मामा, मामी सोबत राहत असते. पुढे तिला समजते की, तिच्या वडिलांची काहीच चूक नसते.

दादासाहेब मोहिते नावाच्या इसमाने तो घाट घातलेला असतो. तिच्या वडिलांना अडकवलेले असते. त्यांच्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले असते. त्या इसमाला त्याने केलेल्या चुकांची शिक्षा करण्याचे ती ठरविते. त्यानंतर ती नकळतपणे दादासाहेब मोहितेचा पुत्र अभिषेकच्या प्रेमात पडते. तिच्यापुढे प्रश्न निर्माण होतो की, ती प्रेम कसं स्वीकारते, दादासाहेब मोहितेना कसे उद्ध्वस्त करते, हे सारे पुढे पुढे मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना हळूहळू ही मालिका आवडू लागली आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे ही मालिका कॅमेऱ्याने चांगली दाखविण्याचा प्रयत्न होत आहे.पत्रकाराच्या भूमिकेसाठी तिने खूप तयारी केली. तिचा खरा मामा पत्रकार होता, त्यांच्याकडून तिने काही टिप्स घेतल्या. या मालिकेचे दिग्दर्शक, सहकलाकारांकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. तिला लिखाण करायला आवडते. गाणी ऐकायला आवडतात. तिला वाचायला, फिरायला, चांगली नाटकं, चित्रपट पाहायला आवडतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -