Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षेची अर्ज प्रक्रिया

SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! 'या' तारखेपासून सुरु होणार परीक्षेची अर्ज प्रक्रिया

राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर


मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam) विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांतच दहावीचे विद्यार्थी परिक्षेसाठी अर्ज करु शकणार आहेत.


राज्य मंडळाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, ७ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तर ५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान, दहावीचे विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत भरण्यात येतील.

Comments
Add Comment