मुंबई: नवरात्रीच्या आज दुसऱ्या दिवशी अधिष्ठात्री देवी ब्रम्हाचारिणी आहे. देवीचे हे स्वरूप अति रमणीय आणि भव्य असे आहे. ब्रम्हचा अर्थ तप आहे. म्हणजेच तप करणारी देवी. नारदमुनींच्या सांगण्यावरून अनेक हजारो वर्षांपर्यंत त्यांनी भगवान शिवांसाठी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच त्यांचे नाव ब्रम्हचारिणी पडले.
देवीच्या एका हातात कमंडलु आणि दुसऱ्या हातात जपमाळ करणारी माळ आहे. मातेचे हे तपोमय रूप सर्वांना फळ देणारे आहे. तिची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनात सद्गुणांची वृद्धी होते. तसेच प्रत्येक कामात यश मिळते.
ब्रम्हचारिणी देवीचा मंत्र
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलु | देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
ब्रम्हचर्य केल्याने सामर्थ्य प्राप्ती होते. तसेच त्याला एक अर्थ आहे. जेव्हा आपण या देवीची आराधना करतो तेव्हा आपल्यात ब्रम्हचर्येचे गुण जागृत होतात.
या दिवशी देवी मातेला तुम्ही नैवेद्यात साखर आणि पंचामृत अर्पण करू शकता.