मुंबई: आरोग्यासाठी दुधाला अतिशय फायदेशीर मानले जाते. अनेक दशकांपासून भारतात दररोज दूध पिण्याची परंपरा आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जी चांगल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेची असतात. जर तुम्ही दररोज एक ग्लास दूध पित असाल तर म्हातारपणापर्यंत तुम्ही निरोगी राहू शकता.
समोर आलेल्या अभ्यासानुसार गायीच्या दुधात ८७ टक्के पाणी आणि बाकी ३७ टक्के पोषकतत्वे असतात. दुधामध्ये १३ टक्के प्रोटीन याशिवाय फॅट, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन्स आणि अनेक गरजेची मिनरल्स असतात.
एका वयस्कर व्यक्तीलाल दररोज २२६ ग्रॅम म्हणजेच १ ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्य चांगले राहील. तुम्ही दूध कोणत्याही वेळेस प्यायले तरी फायदा होईल. मात्र रात्री झोपण्याआधी दूध घेतले तर त्याचे फायदे अधिक होतात.
झोपण्याच्या आधी दूध प्यायल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते. कारण दुधामुळे झोपेसाठी लागणारे मेलाटोनिन हार्मोन वाढवते.
जर तुम्ही दिवसा दूध पित असाल तर यामुळे संपूर्ण दिवस भूक लागत नाही. अशातच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दिवसा दूध पिणे अतिशय लाभकारक ठरते.
दरम्यान, प्रत्येक व्यक्तीला दूध पिण्याने फायदा पोहोचेलच असे नाही. काही लोकांना दूध प्यायल्याने गॅसेसचा त्रास होऊ शकतो.