मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानची ५ वी मार्गिका रात्री ११ ते सकाळी ९ वाजेपर्यंत १० तासांसाठी बंद राहील. तर कांदिवली ते गोरेगाव दरम्यानची अप जलद मार्ग रात्री ११ वाजता बंद होईल.
या ब्लॉकमुळे काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील आणि काही ठिकाणी त्या खंडित केल्या जातील. गाडी क्रमांक ९४०७८ विरार-अंधेरी फास्ट लोकल शनिवारी बोरीवलीला रात्री १०.४४ वाजता वाजता खंडित करण्यात येईल. गाडी क्रमांक ९४०७९ अंधेरी-भाईंदर जलद लोकल शनिवारी रात्री ११.५५ वाजता बोरिवली येथून निघेल.
तर रविवारी गाडी क्रमांक ९२००१ बोरीवली-विरार लोकल बोरिवलीहून सकाळी ४. ४२ वाजता निघेल व गाडी क्रमांक ९००४ बोरीवली-चर्चगेट लोकल बोरिवलीहून सकाळी ३.५० वाजता सुटेल. तर या ब्लॉक कालावधीत पाचव्या मार्गावरील सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील.