Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCabinet Decision : विधानसभेपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; मोदींच्या मंत्रिमंडळात अहिल्यानगर...

Cabinet Decision : विधानसभेपूर्वी केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; मोदींच्या मंत्रिमंडळात अहिल्यानगर नामांतरास मंजुरी

 मुंबई : आता विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धूम-धडाका सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. राज्याची मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१०) पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही राज्य मंत्रिमंडाळाची दुसऱ्यांदा घेतलेली (Cabinet Meeting) बैठक आहे. ३३ मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. केंद्रानं देखील विधानसभेपूर्वी आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव ‘अहिल्‍यानगर’ असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास २ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.

नामांतरास पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्‍ह्याचे नाव ‘अहिल्‍यानगर’ असे करण्याची मागणी होत होती. यादरम्यान या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे पशुसंवर्धन, महसूल,आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. अहिल्यानगर या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, केंद्राकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्धल औरंगाबाद हायकोर्टामध्ये अहमदनगरचे नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा बंद होणार आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -