Thursday, January 16, 2025
Homeताज्या घडामोडीवसई-नालासोपारा-विरार परिसरात महिला अत्याचारात वाढ

वसई-नालासोपारा-विरार परिसरात महिला अत्याचारात वाढ

दिवसाला एक अत्याचार : सप्टेंबर महिन्यात ३३ बलात्कार, सात सामूहिक बलात्काराच्या घटना

वसई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांकडे वसई-नालासोपारा-विरार परिसरात दिवसाला एक असे लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे ३३ बलात्कार आणि सात सामूहिक बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. हा धक्कादायक आकडा मुंबईच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या परिसरात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.

या वर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत २९१ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून, २२८ जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी एकूण ३८० बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली असून, ३७२ जणांना अटक करण्यात आली होती. अशा घटनांमध्ये किशोरवयीन मुलींचा जास्त प्रमाणात समावेश आहे. अनेकदा पालक कामावर जातात असताना, त्यांची मुले आणि पुरुषांशी ओळख होते, नंतर त्यांना फूस लावून पळवून नेले जाते. आशा प्रकारे त्यांना लैंगिक छळाचे बळी व्हावे लागते. त्यात सोशल मीडियामुळे तरुण मुले, पुरुषांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे. वसई-विरार भागात नोंदवलेल्या बहुतांश बलात्काराच्या घटनांमध्ये पुरुषांबरबर पीडितांना ओळख होती असे निरक्षणातून सिद्ध झाले आहे.

एक १९ वर्षीय महिला तिच्या कॉलेज मैत्रिणीची इंस्टाग्राम पोस्ट पाहून थक्क झाली. ज्यात तिचे नग्न फोटो आहेत. ही घटना महिलेने तिच्या आईला सांगितली की, तिचे दोन वर्षांपूर्वी एका पुरुषासोबत अफेअर होते. ज्याच्यासोबत तिने अर्नाळा, विरार येथील एका लॉजमध्ये संमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने सांगितले की, गेल्या आठवड्यात तिच्या माजी प्रियकराने तिला कॉलेज सोडण्यास सांगितले होते आणि तसे न केल्यास तिचे नग्न फोटो ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी दिली होती. जेव्हा तिने मागे हटण्यास नकार दिला तेव्हा त्याने आपली धमकी पूर्ण केली. महिलेला आचोळे पोलिसांत तक्रार करायची होती. बाललैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याऐवजी आचोळे पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मी सलग पाच दिवस पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तरीही त्यांनी एफआयआर नोंदवला नाही, त्यानंतर तिने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला.

दुसरे असे प्रकरण आहे की, मुंबईतील एका १६ वर्षीय मुलीचे, आचोळे, नालासोपारा येथील अनीस शेख (वय २३) तिच्या ओळखीचा होता. शेख आणि मुलीचे त्याच्या घरी २ सप्टेंबर रोजी संमतीने शारीरिक संबंध होते. यानंतर शेखने तरुणीची ओळख त्याचा मित्र जियानशी करून दिली आणि तिघेही नालासोपारा येथील एका उद्यानात गेले. यानंतर ते अर्नाळा येथील एका लॉजवर गेले, तेथे दोघांनी तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. तिला गप्प बसवण्यासाठी त्यांनी या गुन्ह्याचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शेखला अटक केली आहे.

अर्नाळ्यात अनेक बेकायदेशीर लॉज आहेत जे गुन्हेगारीचे ठिकाण बनले आहेत. या लॉजमध्ये ग्राहकांकडून ओळखीचा पुरावा मागितला जात नाही आणि दर तासाला खोल्या भाड्याने दिल्या जातात. मुंबई पोलिसांना अक्सा, मढ आयलंड आणि गोराई येथील लॉजच्या बाबतीत जी समस्या भेडसावत होती, तिच समस्या आता वसई-विरारमध्ये पोलिसांना भेडसावत आहे. या किनारी भागातून समुद्रकिनारे आणि इतर रिकाम्या भागात सहज प्रवेश मिळतो. साहजिकच, पोलिस बलात्काराचे गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करतात.

महिलांना अंधार पडल्यानंतर शांत, निवासी भागात चालणे असुरक्षित वाटते. याकडे पालिका अधिकारी आणि पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागारिकांचे मत आहे. महिला हेल्पलाइनला शेकडो कॉल येतात परंतु त्यातील बहुतांश संबंध सहमतीने सुरू होतात परंतु नंतर ते लैंगिक छळ आणि बलात्कारात बदलतात. अनेकदा ड्रग्ज सारखे व्यसनी लोक असे गुन्हे करतात. अनेकदा मुलींचा रस्त्याने चालतांना विनयभंग होतो.

अशा प्रकारच्या गुन्ह्याला सामाजिक पैलू देखील आहेत. त्यापैकी पालकांची अनुपस्थिती किंवा पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव हे अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलांसाठी एक धोकादायक कारण आहे. मुली अशा गुन्ह्यांना बळी पडण्याचे हे एक मुख्य कारण आहे. अनेक वेळा लग्न करण्याचे आश्वासन देऊन बलात्कार केला जातो. अनेक वेळा संमती संबंध ठेवले जातात, नंतर काही कारणे बिनसले की बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस स्टेशमध्ये जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -