पुणे: माजी क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेता सलील अंकोलाच्या आईचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह पुण्याच्या फ्लॅटमध्ये आढळला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडित महिलेच्या गळ्यावर जखमेचे निशाण आहेत. दरम्यान ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू याचा तपास पोलीस करत आहेत. घरात जबरदस्ती घुसल्याचे कोणतेही निशाण नाहीत.
सलिल अंकोला यांनी आपल्या आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर जाहीर केली. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे फोटोसोबत तीन शब्द लिहिले, गुड बाय मॉम. सलील अंकोला यांनी भारतासाठी कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १ कसोटी आणि २० वनडे सामने खेळले आहेत.
सलील अंकोला यांची पहिली पत्नी परिणीताने गेल्या वर्षी फाशी लावून घेत आत्महत्या केली होती. ४६ वर्षीय परिणीता दोन मुलांची आई होती. गेल्या चार वर्षांपासून ती पुण्यामध्ये आपल्या आईवडिलांसह राहत होती. अंकोलाने परिणीतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले आहे.
पाकिस्तानविरुद्ध सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण करणाऱ्या सलील अंकोला यांचे क्रिकेट करिअर तितके चांगले राहिले नाही. टीम इंडियामध्ये काही वर्षे आत-बाहेर राहिल्यानंतर त्यांनी १९९६मध्ये निवृत्ती घेतली. यानंतर सलील अंकोलाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी अनेक सिनेमे तसेच मालिकांमध्येही काम केले.