Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीपोलीस चकमकीत ३० नक्षलवादी ठार

पोलीस चकमकीत ३० नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात आज, शुक्रवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झालेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. दरम्यान ही चकमक अजूनही सुरू असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नारायणपूर आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचनाक पोलिस पथकावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला सतर्क असलेल्या पोलिस दलाने तत्काळ प्रत्युत्तर दिले. यात काही नक्षलवादी ठार झाले असून पोलिसांना आतापर्यंत ३० मृतदेह गवसले आहेत. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यानंतर ते क्षेत्र सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि उर्वरित नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आणखी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ऑपरेशन सुरू ठेवत असल्याचे देखील एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनही जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे.

विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात विविध चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलांनी १८१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाचा नायनाट करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत मार्च २०२६ पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे, असे शाह म्हणाले होते. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -