Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीJanhvi Kapoor: जान्हवी कपूरसारखी फिगर हवीये तर फॉलो करा हे रूटीन

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरसारखी फिगर हवीये तर फॉलो करा हे रूटीन

मुंबई: आपल्या शानदार फिटनेसमुळे जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जाणून घेऊया तिच्या शानदार फिटनेसचे रहस्य काय आहे. बॉलिवूडमधील उगवता तारा म्हणून जान्हवी कपूरकडे पाहिले जाते. कमी वयातच तिने बॉलिवूडमध्ये चांगले काम केले आहे. यासोबतच जान्हवी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही अनेक अभिनेत्रींना मात देते.

फिटनेसबाबत बोलायचे झाल्यास जान्हवी कपूर जोरदार वर्कआऊट करते. सोबतच तिचा डाएट प्लानही जबरदस्त आहे. यामुळेच तिची फिगर मेंटेन राहण्यास मदत होते.

फिट राहण्यासाठी जान्हवी कपूर जिममध्ये वर्कआऊट करते. तिच्या जिममधील रोजच्या रूटीनमध्ये केवळ एक्सरसाईज नव्हे तर योगाचाही समावेश आहे. जान्हवी बऱ्याच काळापासून योगा करते आहे. याच कारणामुळे ती नेहमी फिट आणि एनर्जेटिक असते.

जान्हवी दररोज वॉक करते. यासोबतच तिला रोप ट्रेनिंगही आवडते. यासोबत ती कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या माध्यमातून स्वत:ला फिट आणि निरोगी ठेवते. जान्हवीला डान्स करायलाही खूप आवडते. तिच्या मते डान्सही एक प्रकारची एक्सरसाईज आहे. यामुळे ती बेली डान्स आणि क्लासिकल डान्स करते.

जान्हवीच्या मते फिट राहण्यासाठी वर्कआऊटसोबत योग्य डाएट असणे गरजेचे आहे. जान्हवी कपूर घरी बनवलले जेवण घेते. ती सकाळी उठताच लिंबू आणि मध टाकून पाणी पिते. जान्हवीला पंजाबी खाणे खूप आवडते. नाश्त्यामध्ये ती पराठा, दही, ज्यूस घेते. सोबतच ताजी फळे, टोस्ट, नट्स, स्मूदी घेते.

लंचमध्ये जान्हवी डाळ, चपाती, ब्राऊन राईस, ग्रिल्ड चिकन अथवा फिश खाणे पसंत करते. यात मोठ्या प्रमाणात भाज्यांचा समावेश असतो. जान्हवीचा डिनर अतिशय कमी असतो. ती डिनरमध्ये फक्त सलाड अथवा सूप पिणे पसंत करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -