Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीजिओ वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता! ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी आणले 'हे' नवीन प्लॅन

जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता! ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी आणले ‘हे’ नवीन प्लॅन

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने (Reliance Jio) मोबाइल रिचार्जचे दर (Recharge Price Hike) वाढवले. यामुळे ऐन सणासुदीच्या महागाईत जिओ वापरकर्त्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. या दरम्यान बीएसएनएलने (BSNL) रिचार्ज प्लान स्वस्त केले होते. त्यामुळे अनेक युझर्स फायद्यासाठी इतर पर्यायांचा वापर करत होते. परंतु रिचार्ज दरवाढ झाल्यानंतर जिओ वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी नवीन प्लॅन काढले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत नवीन प्लॅन.

९९९ रुपयांचा प्लान

९९९ रुपयांमध्ये ९८ दिवसांचा प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. जर तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क परिसरात असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकून 196GB डेटा मिळणार आहे.

८९९ रिचार्ज प्लान

८९९ रुपयांचा रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि १०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच 5G नेटवर्क भागात 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये एकूण 200GB डेटा मिळणार असून हा प्लॅन ९० दिवसांचा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -