Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीपुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या शाळेच्या बसची तोडफोड; देवेंद्र फडणवीसांनी दिली...

पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या शाळेच्या बसची तोडफोड; देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे: बदलापूर शाळेतील दोन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीस अटक केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहरामधील पोलिस स्टेशनच्या आवारात असलेली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली शाळेची बस दगडाने फोडली.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्या स्कूल व्हॅनमध्येच लहान मुलीवर अत्याचार झाला. आम्हाला देखील लहान मुलं आहेत. आज लहान मुली, महिला सुरक्षित नाही. सरकारनं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सर्वात मोठी शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. व्हॅन फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आलं आहे की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यास मदत केलेली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा शेवटी आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -