मध्य रेल्वेचे लोकलचे नवीन वेळापत्रक जारी

जलद लोकलला कळवा, मुंब्रा थांबा


मुंबई : मध्य रेल्वेने नुकतेच एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार अनेक लोकल सेवांच्या वेळेत बदल केला आहे. सीएसएमटी-कसारा लोकल दररोज रात्री १२.१४ वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटते. येत्या ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी-कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी-कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे. या दोन्हीही लोकल ६ ते १२ मिनिटे लवकर सुटणार आहेत.


तसेच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील २४ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी-ठाणे चालवण्यात येणाऱ्या ६ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील गर्दी कमी व्हावी, यासाठी २२ अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येणार आहे. या लोकल दादरवरुन डाऊन दिशेला रवाना होतील.


त्यानंतर दादर येथील नवीन फलाट क्रमांक ११ वरून या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा या ठिकाणीही थांबा देण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी सकाळी ८.५६ वाजता कळवा येथे आणि सकाळी ९.२३ वाजता मुंब्रा येथे जलद लोकल थांबेल. तर, गर्दीच्या वेळी सायंकाळी ७.२९ वाजता कळवा आणि सायंकाळी ७.४७ वाजता मुंब्रा येथे जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित केले आहेत. सकाळी ६.०३ च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी ६.०५ वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ७.०४ वाजता पोहचेल. सकाळी ६.०३ च्या कुर्ला-कल्याण लोकलचे वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून ही लोकल सकाळी ६.०५ वाजता कुर्ला येथून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ७.०४ वाजता पोहचेल.

Comments
Add Comment

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)