मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात, गोरेगाव येथे गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३० ते ४: ३० दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ४ तास, म्हणजेच ३ आणि ४ ऑक्टोबरला २:०० ते ३: ३० दरम्यान सर्व मार्गांवर १:३० तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाईल.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक दरम्यान, सर्व जलद मार्गावरील लोकल बोरीवली ते अंधेरी दरम्यान १२: ३० ते ४ : ३० या वेळेत धिम्या मार्गावर धावतील. बोरिवली आणि अंधेरी दरम्यान १२: ३० ते ४ : ३० पर्यंत धीम्या मार्गावर मेल/एक्स्प्रेस गाड्या बोरीवली आणि अंधेरी दरम्यान धावतील.
याव्यतिरिक्त, काही मेल/एक्स्प्रेस गाड्या १० ते २० मिनिटे उशीराने धावतील. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या प्रभावित होतील आणि ब्लॉक कालावधीत त्या रद्द / शॉर्ट टर्मिनेटेड होतील. रद्द केलेल्या गाड्यांची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध आहे.