Sunday, August 24, 2025

'इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल' मिसाईल हल्ल्यानंतर नेतन्याहू यांचे खुले आव्हान

'इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल' मिसाईल हल्ल्यानंतर नेतन्याहू यांचे खुले आव्हान

नवी दिल्ली: इराणकडून मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्याबाबत इस्त्रायलने कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इराणने खूप मोठी चूक केली आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल. सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीच्या सुरूवातीला नेतन्याहू म्हणाले की जे कोणी त्यांच्यावर हल्ला करतील त्यांना ते प्रत्युत्तर देतील.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, इराणने आज रात्री खूप मोठी चूक केली आणि याची त्यांना किंमत मोजावी लागेल. मी जाफामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो तसेच जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मिसाईल हल्ल्याप्रमाणेच या दहशतवादी हल्ल्यामागे एक प्राणघातक मार्गदर्शक हात होता.

जपान, अमेरिकाने दिली ही प्रतिक्रिया

इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी जपान आणि अमेरिकेने निंदा व्यक्त केली आहे. जपानचे नवे पंतप्रधान शिगेरू इशिबा म्हणाले इराणकडून इस्त्रायलवर करण्यात आलेले मिसाईल हल्ले अस्वीकारार्ह आहेत. आम्ही याची निंदा करतो. मात्र त्यासोबतच स्थिती शांत करण्यासाठी आणि याला पूर्ण युद्धात रूपांतरित होण्यापासून रोखण्यासाठी मदत करू इच्छितो. अमेरिकाने मोठ्या युद्धाच्या शंकेमुळे तेहरानच्या हल्ल्याविरुद्ध प्रत्युत्तर कारवाई करण्याचे वचन दिले आहे.

Comments
Add Comment