Sunday, October 19, 2025
Happy Diwali

IND vs BAN: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने बनवला हा रेकॉर्ड

IND vs BAN: १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने बनवला हा रेकॉर्ड

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पहिल्या तीन दिवशी मुसळधार पावसामुळे वाया गेले. मात्र शेवटच्या २ दिवसांत भारताने असा खेळ केला की कानपूरमध्ये एखादा कसोटी सामना खेळवला जात असे वाटलेच नाही. आता भारत असा पहिला देश बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणतेही मेडन ओव्हर न खेळता विजय मिळवला.

दोन्ही डावांत नाही खेळली मेडन ओव्हर

क्रिकेटमध्ये असे आधीही घडले आहे की जेव्हा एखाद्या संघाने मेडन ओव्हर खेळता सामना जिंकण्याची कामगिरी केली. १९३९ मध्ये डरबनमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात असे घडले होते. इंग्लंडने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी एकही मेडन ओव्हर टाकायला दिली नव्हती. हा साना इंग्लंडने एक डाव आणि १३ धावांनी जिंकला होता.

त्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बॅटिंग केली नव्हती. यामुळे भारत असा पहिला देश बनला आहे ज्यांनी दोन्ही डावांत मेडन ओव्हर न टाकता कसोटी सामना जिंकला आहे. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला होता. तर सामन्यांच्या पहिल्या ३ दिवसांत पाऊस झाला होता. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने जोरदार बॅटिंग केली आणि ३४.४ षटकांत २८५ धावा केल्या होत्या.तर दुसऱ्या डावात भारताला ९५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १७.२ षटकांत पूर्ण केले होते.

Comments
Add Comment