मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात दान हे सर्वोत्तम कार्य असल्याचे म्हटले आहे. लोकांनी त्यांच्या कुवतीनुसार दान करावे. आचार्य चाणक्य म्हणतात की दान केल्याने कोणाचीही धन-दौलत कमी होत नाही तर ती अधिक वाढते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार गरजवंचाना तसेच गरिबांना नेहमी मदत करायला पुढे सरसावले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे तसेच औषधांची मदत करताना कोणताही विचार करू नये.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही धार्मिक कार्यांसाठी पैसे खर्च करताना विचार केला नाही पाहिजे. धार्मिक गोष्टींसाठी पैसे खर्च करणारी व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंदीआनंद येतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने सामाजिक कार्यांमद्येही पैसे खर्च करताना कंजूसपणा केला नाही पाहिजे. आपण प्रत्येकजण समाजाचे काहीतरी देणे लागतो. योग्य ठिकाणी पैसे खर्च केल्याने नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो.
चाणक्य नेहमी सल्ला देतात की आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने दानधर्म केला पाहिजे. दरम्यान, कुवतीपेक्षा अधिक दान करून कंगालही होऊ शकता.