Sunday, May 11, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: मधासोबत रोज सकाळी खा लसूण, होतील जबरदस्त फायदे

Health: मधासोबत रोज सकाळी खा लसूण, होतील जबरदस्त फायदे

मुंबई: शरीरावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात.


यासाठी लोक विविध प्रकारच्या वेट लॉस सप्लिमेंट्सचाही वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की आपल्या किचनमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.


रोज सकाळी एक चमचा मधासोबत लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने वेट लॉस कंट्रोल करण्यास मदत होते.


लसूण आणि मध दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. लसूण मधासोबत चावून खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढते. यामुळे पाचनतंत्र सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.


जर तुम्ही नियमितपणे रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचे सेवन करत असाल तर कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यास मदत होते. तसेच यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो.

Comments
Add Comment