Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! 'या' तारखेपासून सुरु होणार अंडरग्राऊंड मेट्रो ३चा प्रवास

जाणून घ्या स्थानकं, तिकीट दर आणि वेळ


मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान येत्या शनिवारी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी ते मुंबई, ठाणे दौऱ्यावर असून मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं (Mumbai Metro 3) आणि पहिल्या अंडरग्राउंड (Underground Metro) फेजचे उदघाटन करणार आहेत.


त्यामुळे तीन दिवसातच आरे-वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) अशी १२.५ किलोमीटर लांब असणारी मेट्रो फेज ३ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. दरम्यान या मेट्रो लाइनवर दहा स्टेशन असून ही मेट्रो लाइन दक्षिण मुंबईमध्ये कुलाबापर्यंत जाणार आहे. याबाबतचा उर्वरित भाग मार्च २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मुंबई मेट्रो फेज-३ स्टेशनची नावे कोणती?



  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो (मुंबई सेंट्रल मेट्रो)

  • विज्ञान केंद्र (विज्ञान संग्रहालय)

  • शीतला देवी मंदिर वांद्रे कॉलोनी (विद्यानगरी)

  • सांताक्रूझ मेट्रो

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी१

  • सहार रोड

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी२

  • एमआयडीसी - अंधेरी

  • आरे जेवीएलआर


तिकिट दर किती?


मुंबईची पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी अंडरग्राउंड मेट्रो (कुलाबा-ब्रांदा-सीप्ज) याची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर इतकी आहे. याचं तिकिट १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यत असेल.



मेट्रोची वेळ काय ?


या मार्गावरील मेट्रो सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत धावणार आहेत. विकेंडला सकाळी साडेआठ वाजता पहिली मेट्रो धावेल, रात्री साडे दहा वाजता अखेरची मेट्रो असेल.


या मार्गावर मेट्रोच्या प्रतिदिवस ९६ फेऱ्या असतील. आठ डब्ब्याच्या प्रत्येक मेट्रोमधून एकाचवेळी अडीच हजार प्रवाशी जातील, असा एमएमआरसीएल अधिकाऱ्यांना अंदाज आहे. प्रत्येक सात मिनिटांला मेट्रो धावेल.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा