जाणून घ्या स्थानकं, तिकीट दर आणि वेळ
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान येत्या शनिवारी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी ते मुंबई, ठाणे दौऱ्यावर असून मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं (Mumbai Metro 3) आणि पहिल्या अंडरग्राउंड (Underground Metro) फेजचे उदघाटन करणार आहेत.
त्यामुळे तीन दिवसातच आरे-वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) अशी १२.५ किलोमीटर लांब असणारी मेट्रो फेज ३ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. दरम्यान या मेट्रो लाइनवर दहा स्टेशन असून ही मेट्रो लाइन दक्षिण मुंबईमध्ये कुलाबापर्यंत जाणार आहे. याबाबतचा उर्वरित भाग मार्च २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई मेट्रो फेज-३ स्टेशनची नावे कोणती?
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो (मुंबई सेंट्रल मेट्रो)
- विज्ञान केंद्र (विज्ञान संग्रहालय)
- शीतला देवी मंदिर वांद्रे कॉलोनी (विद्यानगरी)
- सांताक्रूझ मेट्रो
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी१
- सहार रोड
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी२
- एमआयडीसी – अंधेरी
- आरे जेवीएलआर
तिकिट दर किती?
मुंबईची पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी अंडरग्राउंड मेट्रो (कुलाबा-ब्रांदा-सीप्ज) याची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर इतकी आहे. याचं तिकिट १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यत असेल.
मेट्रोची वेळ काय ?
या मार्गावरील मेट्रो सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत धावणार आहेत. विकेंडला सकाळी साडेआठ वाजता पहिली मेट्रो धावेल, रात्री साडे दहा वाजता अखेरची मेट्रो असेल.
या मार्गावर मेट्रोच्या प्रतिदिवस ९६ फेऱ्या असतील. आठ डब्ब्याच्या प्रत्येक मेट्रोमधून एकाचवेळी अडीच हजार प्रवाशी जातील, असा एमएमआरसीएल अधिकाऱ्यांना अंदाज आहे. प्रत्येक सात मिनिटांला मेट्रो धावेल.