मुंबई: अनेकदा आपण रिचार्ज करत असताना कोणते रिचार्ज करावे हे लक्षात येत नाही. काहीजण सर्व रिचार्ज पारखून घेतात आणि त्यातील फायदेशीर आणि स्वस्त रिचार्ज निवडतात. यामुळे खिशावर अधिक ताण पडत नाही. हीच बाब लक्षात घेता टेलिकॉम कंपन्यांनी एकापेक्षा एक असे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. यात जिओचा एक नवा प्लान जोडण्यात आला आहे. ९९९ रूपयांचा हा प्लान आहे.
जाणून घ्या या प्लानचे फायदे
जिओच्या ९९९ रूपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ९८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.
प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो जर ९८ दिवसांच्या हिशेबाने डेटा पाहिल्यास एकूण १९६ जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड ५ जी डेटासोबत येतो.
कॉलिंगसाठी प्रत्येक प्लानप्रमाणे यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देण्यात आला आहे. सोबतच यात दिवसाला १०० एसएमएस मिळतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा समावेश आहे.
अरे बापरे ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.