Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

शाळा संचालकांसह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

शाळा संचालकांसह सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. तर दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार झालेल्या संबंधित शाळेच्या संस्था चालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या शाळेच्या ट्रस्टींना अटकपूर्व जामीन नाकारत मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे . याबाबत मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधातदेखील पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली, त्यांच्यावरदेखील सुनावणी सुरू आहे.

अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला. न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला.

गुन्हा दाखल होण्याआधीच विश्वस्त फरार

शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचे उच्च न्यायालयाचे मत असून शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली, असे कोर्टाने म्हटले आहे. गुन्ह्याची माहिती मिळाल्यांतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास शाळेच्या विश्वस्तांनी टाळाटाळ केली, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले. तसेच घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. आम्ही त्यांना शोधण्यात अजूनतरी अपयशी ठरलो आहोत, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात कबुली दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा