मुंबई: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर बुधवारी लागत आहे. हे सूर्यग्रहण ६ तास ४ मिनिटे असणार आहे. या सूर्य ग्रहणाच्या दिवशी पितृ अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण नेहमी अमावस्येदिवशी लागते तर चंद्र ग्रहण पोर्णिमेच्या दिवशी असते.
सूर्यग्रहणाआधी १२ तास सूतक काळ सुरू होतो. या काळात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. सूतक काळात भोजन बनवणे, जेवणे, पुजा पाठ करता येत नाही.
सूर्यग्रहणाची वेळ
वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी लागेल. हे सूर्यग्रहण गुरूवारी ३ वाजून १७ मिनिटांनी संपेल. हे सूर्यग्रहण एकूण ६ तास ४ मिनिटांचे असेल.
या ठिकाणी दिसणार ग्रहण
हे सूर्य ग्रहण चिली, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, उरुग्वे, पेरू, न्यूझीलंड, फिजी, इक्वेडोर, अंटार्टिका, टोंगा, अमेरिका, पॅराग्वे या ठिकाणी दिसेल.
भारतात दिसणार नाही
हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळही मान्य असणार नाही.






