चिन्ह’ही मिळालं; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
मुंबई : लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांनी विधानसभेच्या (Assembly Election 2024) रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच त्यांना आता निवडणूक आयोगाने (Election Commission) ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली असून चिन्ह देखील दिलं आहे. अशी माहिती संभाजीराजेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून छत्रपती संभाजीराजे संघटनेला निवडणूक लढवण्यासाठी “सप्त किरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024