अनेक रस्ते बंद; ‘असे’ असतील पर्यायी मार्ग
मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amiyt Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. तर येत्या ५ ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra) करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर असून ते ठाणे येथे रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. यावेळी सुमारे ४० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्यातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांचा खोळंबा टळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
काय आहेत पर्यायी मार्ग?
- गुजरात येथून ठाण्यात येणारी वाहने विक्रमगडमार्गे नवी मुंबई येथून मुंबईच्या दिशेने जातील.
- नाशिक कडून येणारी वाहने मुरबाड मार्गे कल्याण येथून मुंबईचा दिशेने जाणार आहेत.
- मुंबई कडून येणारी वाहने ऐरोली मार्गे कल्याण येथे जाणार आहेत.
- नवी मुंबई येथून येणारी वाहने कल्याणमार्गे नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणार आहेत.