Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Ladki Bahin Yojana : नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा होणार साजरा!

Ladki Bahin Yojana : नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा होणार साजरा!

नांदेड : संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य योजनांचा आनंद सोहळा ७ ऑक्टोबरला नांदेडमध्ये होत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे.


राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे.


नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.


जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

Comments
Add Comment