Tuesday, April 22, 2025
HomeदेशJammu Kashmir: ४० जागा, ४१५ उमेदवार, जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

Jammu Kashmir: ४० जागा, ४१५ उमेदवार, जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल. मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात होऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल. या टप्प्यात ७ जिल्ह्यातील ४० जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह ४१५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी २० हजाराहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात केले आहेत. या टप्प्यात ३९.१८ लाख मतदार ५०६० मतदान केंद्रावर आपले मतदान करतील. १ ऑक्टोबरला जम्मू क्षेत्रातील जम्मू, उधमपूर, सांबा आणि कठुआ, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा येथील ४० जागांवर मतदान होईल. मतदानादरम्यान सुरक्षेसाठी कडक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

दोन टप्प्यांबद्दल बोलायचे झाल्यास १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१.३८टक्के मतदान झाले होते. तर २६ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्या ५७.३१ टक्के मतदान झाले होते.

या जागांवर होणार मतदान

या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बिश्नाह-एससी, सुचेतगड-एससी, आरएस पुरा, जम्मू दक्षिण, बाहु, जम्मू पूर्व, नगरोटा, जम्मू पश्चिम, जम्मू उत्तर, अखनूर-एससी आणि छंब, बानी, बिलावर, बसोहली, जसरोटा, कठुआ-एससी आणि हीरानगर, उधमपुर पश्चिम, उधमपुर पूर्व, चेनी आणि रामनगर-एससी आणि रामगढ़-एससी, सांबा आणि विजयपुर, करनाह, त्रेघम, कुपवाड़ा, लोलाब, हंदवाड़ा आणि लंगेट, सोपोर, रफियाबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वागूरा-क्रीरी आणि पट्टन, सोनावारी, बांदीपोरा, गुरेज ( एसटी) मतदान होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -