Tuesday, July 1, 2025

Maharashtra Homeguard : खुशखबर! यंदा होमगार्ड्त्या घरात दिवाळीचा धुमधडाका

Maharashtra Homeguard : खुशखबर! यंदा होमगार्ड्त्या घरात दिवाळीचा धुमधडाका

कर्तव्य भत्त्यात थेट दुप्पटीने वाढ


मुंबई : राज्यातील होमगार्ड्साठी (Homeguard) आनंदाची बातमी समोर आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) प्रशासनाने (Administration) राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ (Salary Increase) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी होमगार्ड्ससाठी खास असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत होमगार्ड्सच्या भत्त्यात म्हणजेच मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता होमगार्ड्सना मिळणारा पगार थेट दुप्पट झाला आहे. सरकारने त्यासाठी ७९५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा ४० हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे.


सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ५७० रुपये मिळतात. मात्र आता त्यांना दररोज १ हजार ८३ रुपये देण्यात येणार आहे. याशिवाय उपहार भत्ता २०० रुपये, कवायत भत्ता १८० रुपये, खिसा भत्ता १०० रुपये, भोजन भत्ता २५० रुपये अशा सर्व भत्त्यात जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >