Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Metro : नवरात्रोत्सवात रात्री घरी जाणे होणार सोपे! मुंबई मेट्रोने दिली...

Mumbai Metro : नवरात्रोत्सवात रात्री घरी जाणे होणार सोपे! मुंबई मेट्रोने दिली खुशखबर

मुंबई : नवरात्रोत्सव (Navratri Festival 2024) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये तरुण-तरुणींचा गरबा (Garba) खेळण्यासाठीचा एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी तसेच काहीजण देवीच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडतात. अशावेळी कमी प्रमाणात गाड्यांची सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांना घरी परतण्यास त्रास सहन करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेआ मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना नवरात्रीत उशिरापर्यंत घरी जाणे अगदी सोपे होणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येणार आहेत. तर दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे नवरात्रोत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -