Wednesday, April 30, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

Diwali 2024: दुसऱ्यांना देऊ नका या गोष्टी नाहीतर व्हाल कंगाल

Diwali 2024: दुसऱ्यांना देऊ नका या गोष्टी नाहीतर व्हाल कंगाल

मुंबई: वास्तुनुसार नवरात्री आणि दिवाळीच्या आधी घरात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंचे दान तुम्हाला कंगाल बनवू शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत या वस्तू

हिंदू धर्मात दागिन्यांना लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे जेव्हा कोणी हे खरेदी करतात तेव्हा लक्ष्मी मातेसमोर ते ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाला दागिने दान करू नयेत.

पैशांमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. ज्या घरात एक एक रूपयांची बचत केली जाते. त्या घरात कधीही धनाची कमतरता येत नाही. यामुळे कधीही उधार देऊ नका. यामुळे लक्ष्मी माता नाराज होईल.

घराच्या साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्यामुळे कधीही आपल्या घरातला झाडू कोणाला देऊ नये.

घरात वापरला जाणारे पोळपाट, लाटणे आणि तवा कधीही दुसऱ्यांना दोऊ नये. वास्तुशास्त्रात या गोष्टी देण्यास मनाई आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही दूध दिले नाही पाहिजे. कारण दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते.

Comments
Add Comment