मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे बदाम रात्रभर भिजवून खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात.
अनेक जण बदाम पाण्यात भिजवून ठेवतात. यामुळे याचे फायदे दुपटीने वाढतात. दुधात भिजवून खाल्ल्याने बदामाचे फायदे अधिक वाढतात.
बदाम दुधात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने त्यांच्यातील पोषकतत्वे अधिक वाढतात. बदामामध्ये व्हिटामिन ई, फायबर,मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात. यामुळे शरीराला एनर्जी मिळते.
दुधात भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते हे पोटासाठी अतिशय फायदेशीर असते. बदामाच्या बाहेरील आवरणामध्ये फायटिक अॅसिड असते हे भिजवून आणि त्याची साले काढून खाल्ल्याने पचन अतिशय सोपे होते.
बदामामध्ये हेल्दी फायबर आणि फॅट्स असतात हे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. बदाम दुधात भिजवून सेवन करणे हृदयासाठी चांगले मानले जाते.