मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल रेल्वेबाबत सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. अशातच आता रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Trains) वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मरे’च्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार की खोळंबा होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात रेल्वे फलाटांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे अनेकदा फास्ट लोकल वेटिंगवर असतात आणि ट्रेन सुटायला उशीर होतो. परिणामी या लोकल गाड्यांचे पुढील वेळापत्रक बिघडते आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेने २० जलद मार्गावरील लोकल ट्रेन आता दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे वेळापत्रक ६ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
दादर स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे तेथूनच फास्ट लोकल सुटल्यास प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे सीएसएमटी स्थानकातील गर्दीही कमी होण्यास मदत होईल.
मुंबईतील लोकल प्रवास सुखकारक करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर १८० सेकंदांवरुन १५० सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवरील गाड्यांना होणारा उशीर टळणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील लोकल गाड्यांच्या १५० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…