Amit Shah : अमित शहा आज मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर

मुंबई : येत्या ८ ते १० दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, राज्यात भाजपाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महिन्याभरात राज्यात दोन दौरे करणारे भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) १ ऑक्टोबरला पुन्हा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि नवी मुंबईत सभा घेणार असून, मुंबई तसेच कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेणार आहेत.


मागील काही दिवसांत विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता १ ऑक्टोबरला दादर येथील योगी सभागृहात दुपारी १ वाजता मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणुकाही होऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये विधानसभेबरोबरच महापालिकेची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आराखडा तयार केला गेला असून, याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना देण्यात येणार आहे.


यासोबतच ठाणे आणि कोकणात भाजपाची काय परिस्थिती आहे? याचाही आढावा घेतला जाणार आहे. यानंतर सायंकाळी ४ वाजता अमित शहा हे सिडको कन्व्हेक्शन सेंटर, नवी मुंबई येथे कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल