अंधेरीच्या रुग्णालयात दाखल; मिसफायर झाल्याचा संशय
मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता गोविंदाच्या (Govinda) पायात गोळी (Gun Fire) लागल्याने त्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याला अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मिसफायर झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा स्वतःकडील बंदुक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या गोविंदाला तातडीने अंधेरीच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.