Tuesday, April 22, 2025
HomeदेशSunita Willaims : खुशखबर! अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स परतणार पृथ्वीवर; नवा व्हिडीओ...

Sunita Willaims : खुशखबर! अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स परतणार पृथ्वीवर; नवा व्हिडीओ पहाच…

गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये अडकले असून, दोघेजण पृथ्वीवर परत कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. फक्त ८ दिवसाच्या मिशनवर गेलेल्या त्या दोघांना आता सुमारे वर्षभर अंतराळातचं रहावे लागणार आहे. मात्र आता यासदंर्भातली एक नवीन अपडेट समोर आली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरंतर बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर, खूप वाट पाहिल्यानंतर रोस्कोस्मोसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि अंतराळवीर निक हेग हे स्पेसएक्से ड्रॅगन कॅप्सूलच्या द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) मध्ये पोहोचले आहेत. विल्यम्स, बुच यांनी स्पेसएक्सच्या क्रू चे स्वागत केले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह क्रूचा नासाने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, दोघांनीही ज्यामध्ये मायक्रोफोनद्वारे संबोधत करत हेग आणि गोर्बुनोव्ह यांचे स्वागत केलेलं आहे. अंतराळवीर सुनीता आणि बुच हे दोघेही जून २०२४ पासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. शनिवारी SpaceX ने बचाव मोहीम सुरू केली. पुढच्या वर्षी दोन प्रवासी या मोहिमेद्वारे आपल्या मायभूमीवर (पृथ्वीवर) परतणार आहेत.

https://x.com/NASA_Johnson/status/1840540675919544704

नासाने काय म्हटले ?

नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरद्वारे एक्स ( म्हणजे पूर्वीचं ट्वविटर) या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘ऑफिशिअल वेलकम ! एक्सीपीडिशन ७२ च्या क्रू ने क्रू ९ चे स्वागत केलं. नासाचे अंतराळवीर निक हेग, क्रू ९ कमांडर आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह, क्रू ९ मिशन स्पेशलिस्ट, स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर उड्डाण केल्यानंतर स्वागत करण्यात आले.’

बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स जूनपासून अंतराळात आहेत. ५ जून रोजी हे दोघे बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळात गेले होते. सुनीता आणि बुच यांचं हे स्पेसमधलं मिशन ८ दिवसांचं होतं पण आता ते आठ महिन्यांचं झालंय. आत्तापर्यंत अंतराळात त्यांनी ३ महिने घालवले असून दोघांनाही आणखी ५ महिने तरी तिथेच राहावं लागणार आहे. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून दोघे अंतराळात गेले होते, मात्र ते आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे.

सुनीता आणि बुच पुढल्या वर्षी पृथ्वीवर परतणार

सुनीता आणि बुच हे दोघे अजूनही अंतराळातच असून पुढच्या वर्षी ते पृथ्वीवर परत येऊ शकतील. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी मोहिमेचा एक भाग म्हणून औपचारिकपणे त्यांचे काम सुरू ठेवलं आहे. आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ते दोघेही पृथ्वीवर लँड करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -