मुंबई: तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रेमात पडल्यानंतरही मुली आधी प्रपोज का करत नाहीत. अनेकदा मुलेच प्रपोज करतात. या मॉडर्न काळातही प्रेमाची कबुली देण्यास अनेक मुली पुढे येत नाहीत. दरम्यान, आता हळू हळू मुलीही प्रपोज करण्यास लागल्या आहेत. मात्र तरीही असे करण्याआधी त्या हजार वेळा विचार करतात. त्यांना वाटते की जबाबदारी मुलांनीच उचलावी. त्यामुळेच त्या आधी प्रपोज करत नाहीत.
नाकारण्याची भीती
प्रेमात नाकारले जाण्याची भीती प्रत्येकाला असते. त्यामुळे मुलींना आधी प्रपोज करायला नको वाटते. प्रेमात नाकारल्याची भीती हे एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नसते. यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो.
कदर न करणे
मुलीने जर मुलाला प्रपोज केले तर तो मुलगा तिची कदर करणार नाही या भीतीने अनेक मुली मुलांना प्रपोज करत नाहीत.
स्पेशल फील करणे
अनेक अभ्यासामध्ये आढळले आहे की मुलांच्या तुलनेत मुलींना डेटसाठी विचारल्यास खूप आवडते. याच कारणामुळे मुले मुलींना प्रपोज करत नाहीत. कारण मुलींना वाटते की त्यांना स्पेशल फील केले जावे.
बोल्ड टॅग नको
ज्या मुली आपल्या आवडत्या मुलाला प्रपोज करतात त्यांना बोल्ड असा टॅग दिला जातो. मात्र अनेक मुलींना हे आवडत नाही.