मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या संकटकाळात काही गोष्टीं जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. चाणक्य यांच्या मते संकटकाळात ज्या व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतात त्या संकटातून ते लवकर बाहेर येतात.
वाईट काळ सुरू असताना सगळ्यात आधी आपल्या धनाची बचत केली पाहिजे. जर वेळ योग्य नसेल तर पैसा नेहमी समजून-उमजून खर्च केला पाहिजे. व्यर्थ खर्च करू नये.
चाणक्य यांच्या मते पैसा ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यात आधी काम येते. आचार्य चाणक्य म्हणतात की जर वाईट काळ सुरू असेल तर कोणतेही काम उद्यावर ढकलू नये.
असे केल्याने माणूस आणखी संकटे निर्माण करू शकता. तसेच त्रास वाढू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू असेल तर आपण नम्र राहिले पाहिजे. तसेच काळानुसार परिस्थिती बदलते त्यामुळे अनुकूल राहिले पाहिजे. घाबरू नये तर धैर्याने काम केले पाहिजे.