मुंबई: आईस्क्रीमचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला लगेचच पाणी सुते. भूक असो वा नसो आईस्क्रीम खायला सारेच कधीही तयार असतात. असतात. उन्हाळा असो, हिवाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत आईस्क्रीमला पसंती असते. दरम्यान, असे म्हटले जाते की आईस्क्रीम आरोग्यासाठी चांगले नसते. कारण यात साखर, फ्लेवर, कलरसारख्या गोष्टी असतात. ज्या अनेक आजारांचे कारण बनू शकतात.
दरम्यान, काही रिसर्चमधून असे समोर आले आहे की आईस्क्रीम आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम टाकतात. आईस्क्रीम खाल्ल्याने केवळ मूडच सुधारत नाही तर शरीर आणि मेंदूवरही परिणाम होतो.
आईस्क्रीममुळे मानसिक आरोग्य सुधारते
एक कप आईस्क्रीम तुमचा बिघडलेला मूड सुधारू शकते. जेव्हा तुम्हाला चांगले वाटत नसेल तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. तज्ञांच्या मते आईस्क्रीम नॅचरल कूलिंग एजंटप्रमाणे असते. जे पेन रिलीफ आणि स्ट्रेसला दूर करण्याचे काम करते. यासोबतच दुधात ट्रिप्टोफन असते जे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन सेरेटोनिन रिलीज करण्यास मदत करते.
हृदयाच्या आजारांची जोखीम कमी होते
आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित त्रास दूर होतात. डेअरी उत्पादनांपासून बनलेल्या आईस्क्रीममध्ये दूध आणि फॅट असते जे रक्तात साखर जाण्याचा वेग कमी करतात. आईस्क्रीमची ग्लायसेमिक इंडेक्स व्हॅल्यू कमी असते म्हणजे यामुळे शुगर रिलीज नियंत्रणात राहते.
हाडे मजबूत होतात
आईस्क्रीममध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते जे आपल्या हाडांच्या मजबूतीमध्ये फायदेशीर ठरते. यामुळे शरीरांच्या हाडांचे आरोग्य चांगले राहते. आईस्क्रीम अनेक आजारांचा धोका कमी करू शकते.
पचनशक्ती सुधारते
आईस्क्रीममध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.