Monday, October 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजGopichand Padalkar : शरद पवार हे मिनी औरंगजेब; त्यांनीच धनगर समाजाचे वाटोळे...

Gopichand Padalkar : शरद पवार हे मिनी औरंगजेब; त्यांनीच धनगर समाजाचे वाटोळे केले

आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मिनी औरंगजेब असून त्यांनीच धनगर समाजाचे (Dhangar community) वाटोळे केले असल्याची जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. शरद पवार आपल्या आयुष्यात फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोक कोण आहेत? याची देखील चौकशी झाली पाहिजे. मराठ्यांसोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे, असा घाणघातही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले, हे पवारांचे दुखणे आहे. त्यामुळे पवार साहेब नेहमी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. शरद पवारांच्या ५० वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी १०० आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदललेले नाही. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -