मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये आले हे आढळतेच. अनेक भाज्यांमध्ये आल्याचा वापर हा सर्रास केला जातो. तसेच चहामध्येही आल्याचा वापर केला जातो. नियमितपणे आल्याचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो. त्यामुळे आले पोटात जाते. या आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे याचे नियमित सेवन आरोग्यासाठी चांगले असते.
आले हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
यात अनेक प्रकारचे औषधी गुण असतात.
आल्याच्या नियमित सेवनाने पाचनतंत्र सुधारते.
यामुळे इम्युनिटी बूस्ट होते.
आल्याच्या सेवनाने सर्दी-तापापासून सुटका मिळते.
त्रास आणि सूज कमी करण्यातही याचा फायदा होतो.
रक्तप्रवाह सुरळीत होण्यास आल्याची मदत होते.