काठमांडू: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्सखलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर आणि भूस्सखलनामुळे आतापर्यंत १७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण बेपत्ता आहेत.
काठमांडूची मुख्य नदी बागमतीने शुक्रवार आणि शनिवार झालेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक पातळी ओलांडली आहे. तेथील परिस्थिती पाहता तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले आहे.
पुरात अडकलेल्या लोकांना केले जात आहे रेस्क्यू
गृह मंत्रालयाचे प्रवक्ता ऋषिराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात पुरामुळे संबंधित घटनांमध्ये १११ लोक जखमी झाले आहेत. पोखरेलने सांगितले की सर्व सुरक्षा एजन्सीच्या मदतीने तपास अभियान सुरू आहे. नेपाळच्या सैन्याने देशभरात अडकलेल्या १६२ लोकांना हवाई मार्गाने काढले आहे. याशिवाय ४००० लोकांना नेपाळी सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.