Monday, August 4, 2025

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा!

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा!

३४ लाखांहून अधिक लाभार्थींना ५२१ कोटी हस्तांतरित


मुंबई : सध्या राज्यातील बहुचर्चित महायुती (Mahayuti) सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तिसरा हप्ता हस्तांतराला सुरूवात झाली आहे. राज्यातील ३४ लाख ७४ हजार ११६ महिलांना ५२१ कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती राज्य महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एक्स पोस्टमधून दिली आहे.



उर्वरित महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार


उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत, असे देखील मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.



लाडकी बहीण योजना सुरूच राहणार 


विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात. पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील. लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चिन्त राहा. ही योजना कायम सुरु राहणार आहे. निवडणूक डोळ्यसमोर ठेवून आम्ही ही योजना केलेली नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पुण्यातील कार्यक्रमात स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा