Monday, October 7, 2024
Homeक्रीडाIPL मध्ये परत आला हा नियम, धोनीच्या CSKसाठी खुशखबर

IPL मध्ये परत आला हा नियम, धोनीच्या CSKसाठी खुशखबर

मुंबई: आयपीएल २०२५साठी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी बीसीसीआयने रिटेंशनशी संबंधित नियमांची घोषणा करण्यात आली आहे.

आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाच्या नियमांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मेगा लिलावासाठी एकूण ८ नवे नियम जाहीर झाले आहे. यातील ७व्या नंबरचा नियम पाहून सीएसके आणि धोनीचे चाहते नक्कीच खुश होतील.

आयपीएलच्या नव्या नियमानुसार जर एखाद्या भारतीय खेळाडूने पाच वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू मानले जाईल. हा नियम २००८ पासून २०२१ पर्यंतच्या हंगामापर्यंत होता. त्यानंतर आता पुन्हा हा नियम परत घेण्यात आला आहे. याचा फयदा धोनी आणि सीएसकेच्या संघाला होईल.

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वर्ल्डकप २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यावेळेस आयपीएलचे संघ एकूण ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात संघ अधिकाधिक ५ कॅप्ड आणि अधिकाधिक २ अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -