नवी दिल्ली : अब्जाधीश एलन मस्कची (Elon Musk) कंपनी स्पेस एक्सने फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून त्याचे फाल्कन ९ रॉकेट शनिवारी अवकाशात पाठवले. ड्रॅगन अंतराळयानाला अवकाशात नेणाऱ्या या रॉकेटमध्ये नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह असे दोन क्रू सदस्य आहेत. अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Barry E. Wilmore) यांना ड्रॅगन यांनाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.
या चार आसनी रॉकेटमध्ये दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. फाल्कन ९ साठी नवीन लॉन्च पॅड वापरले. क्रू मेंबर मिशनसाठी या पॅडचा पहिला वापर होता. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आयएसएस मध्ये पाठवण्यात आले होते. दोघेही १३ जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले.