Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' उत्पादने खरेदी...

PM Narendra Modi : सणासुदीच्या हंगामात फक्त ‘मेड इन इंडिया’ उत्पादने खरेदी करा!

पंतप्रधान मोदींचे ‘मन की बात’मधून जनतेला आवाहन

नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात फक्त ‘मेड इन इंडिया’ (Made In India) उत्पादने खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) ‘मन की बात’ (Mann Ki Baat) मधून जनतेला केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान ‘मोदी मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज ११४ वा एपिसोड प्रसिद्ध करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी चौथ्यांदा या रेडिओ शोद्वारे (Radio Show) आपले मत व्यक्त केले. यावेळचा एपिसोडही खास आहे कारण तो प्रसारित होऊन दहा वर्षे पूर्ण करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी या ‘मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडीया’ यावर विशेष भर दिला.

“या महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मोहिमेच्या यशामध्ये देशातील मोठ्या उद्योगांचे लहान दुकानदारांचे योगदान समाविष्ट आहे. मी ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलत आहे. आज मला खूप आनंद होत आहे. गरीब,मध्यमवर्ग आणि एमएसएमईंना या मोहिमेचा भरपूर फायदा होत आहे.“या सणासुदीच्या काळात तुम्ही तुमचा जुना संकल्प पुन्हा पुन्हा करा. तुम्ही जे काही खरेदी कराल ते फक्त मेड इन इंडियाच असले पाहिजे. तुम्ही जे काही भेट म्हणून द्याल तेही मेड इन इंडियाच असावे, असे मोदी म्हणाले.

ते म्हणाले,“आमच्या ‘मन की बात’च्या प्रवासाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ सुरू करण्यात आली होती आणि हा असा पवित्र योगायोग आहे की, यंदा ३ ऑक्टोबरला ‘मन की बात’ला १०वर्षे पूर्ण होणार आहेत.

ते म्हणाले,२ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ला १० वर्षे पूर्ण होत आहेत.ज्यांनी भारतीय इतिहासातील एवढी मोठी जनआंदोलन घडवली त्यांचे अभिनंदन करण्याचा हा एक प्रसंग आहे. हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे. आयुष्यभर या कारणासाठी समर्पित राहिले.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -